ब्रेकिंग न्यूज…-लाचखोर वायरमनला रंगेहात पकडले; जळगाव एसीबीची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।– शेतातील टूबेलसाठी थ्री फेज वीज कनेक्शन जोडण्यासाठी तीन हजाराची लाच घेताना महावितरण कंपनीच्या वायरमनला जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे घटनेमुळे महावितरणच्या गोटात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार हे चोपडा तालुक्यातील शेतकरी असून त्यांच्या पत्नीचे नावे असलेल्या दोनगाव शिवारात शेत आहे. शेतकऱ्याने शेतातील टूबेलसाठी थ्री फेज वीज कनेक्शनसाठी महावितरणकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. दरम्यान वीज कनेक्शन जोडण्यासाठी वायरमन अनिल शंकर राठोड (वय-२८ रा. लक्ष्मी नगर धानोरा ता चोपडा) यांनी ४ हजाराची मागणी केली, दरम्यान तक्रारदार शेतकरी यांनी जळगाव येथील लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार आज सापळा रचला तडजोडीअंती वायरमन याने ३ हजार स्वीकारत असताना पथकाने रंगेहात पकडले आहे.

Protected Content