मुलीचा विनयभंग करणाऱ्याला सश्रम कारावासाची शिक्षा

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयाने १ वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी २ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता सुनावली आहे.

सागर सुरेश मराठे रा. धरणगाव असे आरोपीचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरात एका भागात राहणारी अल्पवयीन मुलगी ही ११ मे २०१६ रोजी रात्री तिच्या परिवारासह घराच्या अंगणात झोपलेले असताना सागर सुरेश मराठे रा. धरणगाव हा दारूच्या नशेत अर्धनग्न अवस्थेत अल्पवयीन मुलीजवळ येवून तिचा विनयभंग केला. अल्पवयीन मुलीने आरडाओरड केल्यानंतर तिची आई व शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन सागर मराठेला पकडले व पोलीसांच्या स्वाधिन केले होत. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील खटला जळगाव येथील जिल्हा न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.एस. महाजन यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. सरकार पक्षातर्फे या गुन्ह्यात एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित अल्पवयीन मुलगी व तिची आई यांची साक्ष महत्वाची ठरली. साक्षी पुराव्या अंतिम न्यायालयाने आरोपी सागर मराठे याला दोषी ठरत विविध कलमान्वये १ वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. चारुलता बोरसे यांनी काम पाहिले.

Protected Content