जळगावात सात दिवसीय आरोग्य व अध्यात्म शिबिराचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तप – सेवा -सुमिरन समिती जळगाव व इंटरनॅशनल असोशिएशन फॉर सायन्टीफिक स्प्रीचूअलिज्म मेरठ द्वारा सात दिवसीय आरोग्य व अध्यात्म विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिनेश कक्कड यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी सत्यनारायण खटोड, धनंजय खडके, शुभांगी पवार आदी उपस्थित होते.

 

आधुनिक धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवन शैलीमुळे आपणास अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.यात मधुमेह, उच्च रक्त दाब, थायराॅईड, स्थूलता, कंबर, गुडघेदुखी, चर्म रोग,केस गळणे,कॅन्सर, मानसिक तणाव आदी रोगांचे बळी पडत आहेत.   या व इतर सर्व रोगांचे निवारण केवळ आहार परिवर्तन करून कसे सहज करता येईल व नवीन रोगांपासून कसा बचाव करता येईल हा उद्देश ठेवून सात दिवसीय आरोग्य व अध्यात्म विकास शिबीराचे  आयोजन शुक्रवार दि. ४  ते गुरुवार १० नोहेंबरपर्यंत श्रीक्रुष्ण लॉन शिरसोली रोड येथे करण्यात आले आहे. हे शिबीर एक दिवसीय, तीन दिवसीय व सात दिवसीय शिबिरांच्या शृंखलेतील ९ वे शिबीर आहे. हे शिबीर सकाळी ९ ते १ व दुपारी ४ ते ७ या दोन सत्रात घेण्यात येणार आहे. या शिबिराचे उद्घाटन ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार असून याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मिलिंद वायकोळे,केशव स्मृती प्रतिष्ठान अध्यक्ष भरत अमळकर तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉ. गोपाल शास्त्री हे उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेऊन निरोगी, चिंतामुक्त आरोग्य जगावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले. अधिक माहितीसाठी दिनेश कक्कड – ९८ २२६ १५ ९५१, सत्यनारायण खटोड ९१५८००३१०१ व धनंजय खडके ९८२३० ६६४२४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Protected Content