वसंतराव नाईक जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा

चाळीसगाव प्रतिनिधी । सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करणार्‍या ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनतर्फे कृषीदिनाचे तथा महानायक वसंतरावजी नाईक जयंतीचे औचित्य साधून या महामानवाच्या नावाने अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. 

या पुरस्काराकरीता राज्यभरातील ४३ पुरस्कार्तींची निवड करण्यात आली होती. परंतु कोरोना विषाणुची बाधा पाहता राज्यभरातील निवडपात्र पुरस्कार्तींना आॅनलाईन पद्धतीने गौरविण्यात आले तर जळगांव जिल्ह्यांतील मोजक्याच  निवडपात्र पुरस्कार्तींना संत सेवालाल महाराज विचार मंच टाकळी प्र.चा.येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष संपदा पाटील (उमंग महिला फाऊंडेशन) अजय पवार (गट विकास अधिकारी 2) कैलास माळी (विस्तार अधिकारी) देवेंद्र नाईक, कांतीलाल राठोड, काशिनाथ जाधव, ऍड भरत चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पहार देऊन गौरविण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्यात धृर्वास राठोड, योगेश्वर राठोड,राकेश गवळी, संयोगीता नाईक, गोरख भाऊ चव्हाण, राकेशजी जाधव, मोरसिंगभाई राठोड, सुभाष दादा जाधव,इंदल चव्हाण, शरद भालेराव, दिनकर राठोड, मुकेश देशमाने, आप्पासाहेब नरवडे, चंद्रकांत ठाकरे, लक्ष्मीकांत धानोरकर, सुरेश पाटील, प्रकाश जाधव, दीपेश पष्टे, नितीन पाटील, अशोक जाधव, शाहू संभाजी भारती, कर्मा तेलंग, सत्येंद्र पांडे,महेंद्र कुमावत, भारती करडे, निलेश शिंपी, सुमित राठोड, निखिल चव्हाण, तुळशीराम पवार, सतीश राठोड, डॉक्टर संतोष राठोड, विलास देवळेकर, भारत बंडगर, प्रिया पवार, शैलेश कुलकर्णी, दीपक मोरे, जय राठोड, संदीप चव्हाण, मंगेश रासम, पवन वर्मा, अमर तांबे, शिवाजी राठोड, पवन चव्हाण, व सतीश कुमार माळवे येथील  अवालियांचा गौरव करण्यात आले.

पुरस्कार प्रेरणा देतात व प्रेरणेतुन राष्ट्र निर्माण होते. असे कार्य घडवून आणणारे सामाजिक तथा शैक्षणिक कार्यास प्रेरणा देणारे अशोक राठोड यांच्या या अतुलनीय प्रेरणादायी कार्याची सर्वत्र कौतुक होत आहे.या सोहळ्यात साप्ताहिक वंचितांचा प्रतिनिधीचे संपादक योगेश्वर राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजक ग्लोबल बंजारा अस्तित्व फांऊडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड यांनी सुत्रसंचालन केले तर राकेश गवळी, गजानन चव्हाण, सुरेश पवार, चिंतामण चव्हाण ,मिलिंद भालेराव, भीमराव जाधव,  उदल पवार, नामदेव राठोड, डॉ संदीप चव्हाण यांचे यशस्वितेसाठी मोलाचे सहकार्य लाभले.

 

 

 

Protected Content