घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दोघांवर पोलीसांचा छापा

पोलीस उपअधिक्षकांच्या पथकाची दोन ठिकाणी कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजिंठा चौक आणि जळगाव तोल काटा परिसरात घरगुती गॅसचा काळाबाजार करून वाहनांमध्ये भरतांना पोलीस उपअधिक्षक संदीप गावाती यांच्या पथकाने शुक्रवारी ११ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता छापा टाकून कारवाई केली. दोन्ही ठिकाणाहून एकुण ६५ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील जळगाव शहरातील अजिंठा चौकातील मुरली मनोहर हॉटेलच्या मागे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जळगाव तोल काटा परिसरात घरगुती गॅस हा बेकायदेशीरित्या इतर वाहनामध्ये भरत असल्याची गोपनिय माहिती पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या.  शुक्रवारी ११ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता पोलीस पथकाने पहिली कारवाई अजिंठा चौकातील  मुरली मनोहर हॉटेलच्या मागे असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये केली. यात संशयित आरोपी वसीम कदीर पटेल (वय-२५) रा. मेहरूण, जळगाव हा बेकायदेशीर रित्या घरगुती गॅस इतर वाहनांमध्ये भरतांना आढळून आली. याठिकाणी पोलीसांनी गॅस भरण्याचे साहित्य, व्हॅक्यूमपंप, गॅसहंड्या, वजन काटा  असा एकुण ३० हजार १०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दुसरी कारवाई दुपारी अडीच वाजता जळगाव तोल काटाजवळील आडोश्याला असलेल्या टपरी येथे केली. या ठिकाण संशयित आरोपी शेख आसीफ शेख शकिल (वय-१८) रा. मास्टर कॉलनी, जळगाव हा देखील इतर वाहनात घरगुती गॅस भरतांना दिसून आला. पोलीसांनी कारवाई करत त्याच्याजवळील ३५ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीसांनी दोन्ही कारवाई एकुण ६५ हजार २०० रूपयांची मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पोकॉ सचिन साळुंखे, पोकॉ राहुल पाटील यांनी दिलेल्या वेगवेगळ्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन गुन्ह दाखल करण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस पथकातील पोकॉ सचिन साळुंखे, पोकॉ राहुल पाटील, पो.ना. श्रीकांत ब्रदर, पो.कॉ. शिवाजी हटकर, पो.कॉ. ज्ञानेश्वर हटकर, पो.कॉ. ईश्वर भालेराव, किशोर पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोकॉ अल्ताफ पठाण यांनी केली.

 

Protected Content