‘एक राईड प्रतापराव पाटील सरांसाठी’ उपक्रमाचे आयोजन

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते टी-शर्ट चे अनावरण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव सायकलिस्ट ग्रुप व धुलीया सायकल मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता आकाशवाणी चौक ते भुसावळ रोडवर ‘एक राईड प्रतापराव पाटील सरांसाठी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उपक्रमाच्या टी-शर्टचे अनावरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद  व आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते झाले.

सदर उपक्रमांतर्गत अंदाजे २०० पेक्षा जास्त सायकलपटू सहभागी होणार असून यावेळी जळगाव – खामगाव – जळगाव – पिंपळकोठा – जळगाव या मार्गावर सायकल राईड चे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व सायकलिस्टने आकाशवाणी चौकापासून सकाळी सहा वाजता सदर राईड मध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन सायकलिस्ट ग्रुपने केले आहे.

“टी-शर्ट’ अनावरणास महापौर जयश्री महाजन, महानगरपालिका आयुक्त श्रीमती विद्या गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी श्री प्रतापराव पाटील, जळगाव सायकलिस्ट ग्रुपचे सदस्य सुभाष पवार, राम घोरपडे, रुपेश महाजन, कामीनी धांडे, निलेश चौधरी, अनिकेत पवार. सखाराम ठाकरे, सुनिल चौधरी व इतर सदस्य उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील हे शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार ३१ ऑगस्ट २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. श्री.पाटील हे मुळचे नंदुरबार जिल्ह्यातील असून मागील ५ वर्षांपासून जळगाव जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी गुणवत्तापूर्ण प्रशासकीय कामे करतानाचा सामाजिक क्षेत्रातील बांधिलकीही मोठ्या प्रमाणावर जोपासलेली आहे. त्यांनी जिल्ह्यात सायकलच्या माध्यमातून अनेक युवा तरुण जोडले व जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य विषयक जागरुक राहून सायकल चालविणेबाबत चळवळ जिल्हाभर पोहोचवली व रुजवली. श्री पाटील यांना आजपर्यंत अनेक प्रशासकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलेले आहे.

प्रतापराव पाटील यांना सेवानिवृत्ती पूर्वी मानवंदना द्यावी या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. पाटील यांच्यावर प्रेम करणा-या सर्व सायकलिस्टनी आकाशवाणी चौकापासून भुसावळ रोडने पुढे यथाशक्ती (प्रतापराव पाटील आपल्या वयाच्या 58 व्या वर्षात सेवानिवृत्त होणार असल्याने) 58 कि.मी.. 158 कि.मी., 258 कि.मी. 358 किमी अशा टप्प्यांमध्ये सदर सायकल राईड पूर्ण करण्याचा निर्धार केलेला आहे.

 

Protected Content