घरकुलचा निकाल पुन्हा लांबणीवर ; आता १५ जुलैला घोषित होणार निकाल

333979 jaindeokare 300x169 300x169 1

धुळे (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या जळगाव घरकुल गैरव्यवहाराचा आज निकाल जाहीर होणार होता. परंतू आता याप्रकरणाची पुढील सुनावणी १५ जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, या घरकुल गैरव्यवहार प्रकरणाचा निकाल आज तिसऱ्यांदा लांबणीवर पडला आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, घरकुल गैरव्यवहाराचा याआधी २७ जून रोजी निकाल लागणार होता. परंतू त्यावेळी देखील कोर्ट सुटीवर होते. आज देखील कोर्ट सुटीवर असल्याचे कळते. दरम्यान, माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक दिग्गजांचा संशयितांमध्ये समावेश आहे. त्यामुळे निकाल काय लागतो? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात ४५ कोटी रुपयांचा अपहाराबाबत धुळे जिल्हा कोर्टात निकाल याआधी २१ मे रोजी घोषित होणार होता. परंतू काही संशयित आरोपी गैरहजर असल्यामुळे न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जूनला ठेवली होती. परंतू कोर्ट सुटीवर असल्यामुळे निकाल घोषित करण्यात आला नव्हता. कोर्ट २२ जून रोजी परत येणार असल्यामुळे घरकुल निकालाची पुढील तारीख आता २७ जून देण्यात आली होती. परंतू आज (दि.२७ जून) देखील कोर्ट सुटीवर असल्यामुळे १५ जुलै रोजी निकाल घोषित होण्याची अपेक्षा आहे.

 

घरकुल गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक दिग्गजांचा संशयितांमध्ये समावेश आहे. दरम्यान, या घोटाळ्यात दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा संशयितांना झाल्यास त्यांना निवडणूक लढता येणार नाहीय. त्यामुळे हा निकाल माजी मंत्री सुरेशदादा जैन व गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक दिग्गजांचा राजकीय जीवनावर परिणाम करणारा असणार आहे.

Protected Content