Home क्राईम भरधाव कारने दुचाकीस्वाराला उडविले

भरधाव कारने दुचाकीस्वाराला उडविले

0
106

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल करून पाळधी येथे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वराड खुर्द फाट्याजवळ दुचाकीस्वाराला मागून भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याने जखमी झालेल्या तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ४५ मिनीटांनी घटली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल प्रदिप पाटील (वय-३७) रा. पिंप्री बुद्रुक ता.एरंडोल असे मृत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनिल पाटील हा तरूण एरंडोल तालुक्यातील पिंप्री बुद्रुक येथे वास्तव्याला होता. बुधवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी त्याच्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीएफ ७७२७)ने एरंडोल शहराकडून पाळधी येथे जाणासाठी राष्ट्रीय महामार्गाने निघाला होता. महामार्गावरील वराड खुर्द गावाजवळून जात असतांना मागून भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक  (एमएच १८ बीसी १५२२) ने जोरदार धडक दिली. या अपघात दुचाकीस्वार सुनिल पाटील याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मयत सुनिल पाटील यांचे काका सुभाष रामचंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक प्रकाश मन्साराम माळी रा. एरंडोल यांच्या विरोधा धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी करीत आहे.


Protected Content

Play sound