Home आरोग्य धरणगावात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई ; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ!

धरणगावात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई ; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ!

0
40


धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केल्याने शहरातील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका प्रसिद्ध कचोरी व समोसा विक्री करणाऱ्या दुकानावर प्रशासनाने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

या कारवाईनंतर धरणगाव शहरातील काही दुकाने बंद असल्याचे दिसून येत असून, व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे शहरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.

शहरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्वच्छता, अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि अन्नसुरक्षेसंदर्भातील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईमागील नेमके कारण, संबंधित दुकानावर कोणती कारवाई करण्यात आली आणि पुढील तपासात काय निष्पन्न होते, याबाबत अधिकृत माहिती मिळणे अपेक्षित आहे.

धरणगाव शहरातील या कारवाईमुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये चर्चेला उधाण आले असून, अन्न व औषध प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे नागरिकांचेही लक्ष लागले आहे. विशेष करून या तपासणीत नेमके काय आढळून आले ? याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.


Protected Content

Play sound