पत्रकाराला मारहाण केल्याचा निषेधार्थ पत्रकार संघटनाचे निवेदन

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने भडगाव तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा येथील संदीप महाजन यांना झालेली अमानुष मारहाण यावर मारहाण करणाऱ्या गुंडांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई व्हावी. तसेच या घटनेचा आम्ही जाहिर निषेध करतो असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनावर सोमनाथ पाटिल, सुधाकर पाटील, सागर महाजन, सुनील पाटील, संजय पवार, राजु शेख शेख शकील, नितीन महाजन, जावेद शेख, परमेश्वर मोरे , भास्कर शार्दुल, राकेश पाटिल, दिलीप पाटील, लिलाधर पाटिल, भास्कर पाटील, नरेन्द्र भोसले, भरत ठाकरे, गणेश अहिरे आर.के.मिर्झा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content