जिल्हा केमिस्ट असोसिएशन व आयएमएकडून महापौरांकडे रुमाल, हॅण्ड ग्लोज सुपूर्द !

जळगाव,प्रतिनिधी । महापालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशन आणि आयएमएकडून ४०० व्यक्तींसाठी रुमाल आणि हॅन्ड ग्लोज महापौर भारती सोनवणे व आयुक्त सतिश कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

मंगळवारी मनपाच्या दुसऱ्या मजल्यावर महापौर भारती सोनवणे यांच्या दालनात केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी रुमाल आणि हॅन्ड ग्लोज हे साहित्य महापौरांकडे सुपूर्द केले. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, विष्णू भंगाळे, उपायुक्त अजित मुठे, सहाय्यक आयुक्त पवन पाटील, मुख्य लेखा परीक्षक संतोष वाहुळे, जळगाव जिल्हा मेडिकल डिलर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे, अनिल झंवर, दिनेश मालू, ब्रिजेश जैन, रुपेश चौधरी, आयएमए सचिव डॉ.स्नेहल फेगडे आदी उपस्थित होते.

लवकरच सॅनिटायझर, औषधी देणार – सुनील भंगाळे
मनपा कर्मचाऱ्यांसाठी आज रुमाल आणि हॅन्ड ग्लोज महापौर भारती सोनवणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. सॅनिटायझर देखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून मनपा प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी मोहीम आयोजित केल्यास औषधी देखील केमिस्ट असोसिएशनकडून उपलब्ध करून देण्यात व आयएमएचे सहकार्य घेण्यात येईल, अशी माहिती केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांनी दिली आहे.

Protected Content