जुने जळगावात श्री मरीमाता मुर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळ्याला सुरूवात !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुने जळगाव येथील ग्रामदैवत श्री मरीमाता मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे चार दिवसांच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रस्थापित विधान प्रदान संकल्प गणपती पूजन व इतर पूजन पूजनाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी या परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी १ फेब्रुवारी रोजी प्रस्तास्थित विधान प्रधान संकल्प गणपती पूजन, पुष्पाह वाचन, मातृका पूजन, आयुष्यमंत्र जप, नान्दीश्राद्ध, आचार्य वर्णनम तसेच दुपारी ३ वाजता संपूर्ण ग्रामपंचायत आयोजन करण्यात आले होते. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी स्थापित देवतांना प्रातपूजन समाप्त, मंडळ देवतानाम आवाहन पुजन मूर्ती, जलधिवास, ज्ञानदिवास, शय्यादिवास, आरती पुष्पांजलीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी पहाटे पूजन अग्निस्थापना, गृह ध्वज, मुर्तीन्यास विधी, प्राणप्रतिष्ठा सकल हवन, बलिदान पूर्णहुती आरती आरती असे कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यानंतर शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

आयोजित कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवराज कोल्हे, नितीन खडके, हरीश बारी, पोलीस पाटील प्रभाकर पाटील, दिलीप कोल्हे, सदाभाऊ काळे, गिरधर जावळे, युवा ब्रिगेडीयर्स फाउंडेशन, विठ्ठल पेठ मित्र मंडळ, नरहरी मित्र मंडळ, जुने जळगाव मित्र मंडळ, तेली चौक मित्र मंडळ, जय हनुमान मित्र मंडळ, बारीवाडा मित्र मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, विघ्नहर्ता मित्र मंडळ, तरुण कुढापा मित्र मंडळ, न्यू बाल मित्र मंडळ, चौधरी वाडा मित्र मंडळ, न्यू अजिंक्य मित्र मंडळ, क्रीडा विकास मित्र मंडळ आणि आयवा मित्र मंडळ यासह इतर राज्य सहकार्य लाभत आहे.

Protected Content