Home Cities जळगाव विष्णू भंगाळे यांचा विक्रमी सलग पाचवा विजय !

विष्णू भंगाळे यांचा विक्रमी सलग पाचवा विजय !

0
125

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी विद्यापिठाच्या अधिसभेवर विक्रमी पाचव्यांदा विजय संपादन केला आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेटसाठी पदवीधरांमधून निवडून देण्याच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अखील भारतीय विद्यार्थी परिषद प्रणीत विद्यापीठ विकास मंचने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणीत पॅनलचा पराभव झाला असला तरी या पॅनलचे प्रमुख तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी मात्र आपली जागा अबाधित राखण्यात यश मिळविले.

विष्णू भंगाळे यांनी सिनेटवर लागोपाठ पाचव्यांदा विजय मिळवून अनोखा विक्रम प्रस्थापित केला. काल रात्री हा निकाल जाहीर करताच भंगाळे यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. तर सिनेटवर मात्र विद्यापीठ विकास मंचने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.


Protected Content

Play sound