निकृष्ट रस्त्यांच्या कामांची चौकशी करा – राष्ट्रवादीची मागणी

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव महापालिकेअंतर्गत काही ठिकाणी रस्त्यांची कामे चालू असून त्यांचा दर्जा निकृष्ट आहे.याबाबत चौकशी समिती गठीत करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष (महानगर) अशोक लाडवंजारी यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, जळगाव महापालिकेत काही ठिकाणी रस्त्यांचे काम चालू आहे, ती कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पाहणी केली असता त्यांना त्यात तथ्य आढळून आले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नवी पेठ, मेहरुण परिसरात अमृत योजनेच्या माध्यमातून जे खोदलेले रस्ते होते त्याठिकाणी सहा महिन्यांपूर्वी कॉक्रीटीकरण केले. तेच रस्ते पुन्हा खोदून त्याठिकाणी नविन निविदा काढून नविन रस्ते तयार करण्याचे काम चालू आहे. तसेच शिवाजी पुलाबाबत ठेकेदारास वारंवार मुदत वाढून देत नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मनपा आयुक्तांना याबाबत वारंवार तक्रार केली आहे मात्र ते नेहमीच दुर्लक्ष करीत आहेत. त्यांची भूमिका फारच संशयास्पद असून त्यांच्या कर्मचाऱ्यांना माहितीच्या अधिकारात कामा संदर्भात माहिती मागितली असता ते देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तरी प्रशासनाकडून जनतेच्या पैशांची लुट होत आहे ती त्वरीत थांबविणेसाठी आपणाकडून एक चौकशी समितीची नेमणूक करण्यात येऊन त्यामार्फत याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष (महानगर) अशोक लाडवंजारी, रिकू चौधरी , जितेंद्र बागरे, जयश्री पाटील , हितेश जावळे आदींची उपस्थित होती.

Protected Content