अट्रावल मुंजोबा देवस्थानात अग्निडाग

यावल प्रतिनिधी । संपुर्ण महाराष्ट्रसह खान्देशवासी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यावल तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबा देवस्थानाने (दि.१२ मार्च) रोजी संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक अग्नीडाग घेतला आहे. मागील वर्षी देखील ही शुक्रवारच्याच दिवशीच मुंजोबाने अग्निडाग घेतले होते.     

दरम्यान यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सालाबाद प्रमाणे लाखो भाविकांच्या उपस्थितीत भरणारी यात्रा ही प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करीत रद्द करण्यात आली होती. यावल तालुक्यातील अट्रावल येथील जागृत देवस्थान तथा भक्तांच्या नवसाला पावणारा म्हणुन ख्याती असलेल्या मुंजोबाची यात्रा सालाबाद प्रमाणे दरवर्षी माघ महीन्यात शनिवार आणी सोमवार या दिवसी भरत असते त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील खानदेशवासी भाविक मुंजोबाच्या दर्शनासाठी येत असतात मात्र यंदाही यात्रा रद्द करण्यात आली होती . यात्रा संपल्यावर मुंजोबा हे कोणत्याही दिवसी अग्निडाग घेत असतो अशी भाविकांची श्रद्धा आहे . या कोरोनाचे संकट पुनश्च ओढवल्याने अग्निडाग घेतल्यानंतर होणारे महाप्रसादाचे कार्यक्रम ही रद्द करण्यात आले आहे 

 

Protected Content