पोलिस चौकीची संख्या कमी होईल तेव्हाच समाजाची खरी प्रगती – श्रीमती एस एन माने

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलिस चौकीची संख्या कमी होईल तेंव्हाच समाजाची खरी प्रगती होईल, असे प्रतिपदान जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती एस.एन. माने यांनी केले. एस.एस. माणियार महाविद्यालयाच्या विधी चिकित्सा विभागाच्या वतीने जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे कायदा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

पुढे बोलतांना श्रीमती माने म्हणाल्या की, न्यायालयापुढे समोर जसे पुरावे येतात तसे न्यायालय निर्णय घेते. घरात लहान भाऊ व मोठा भाऊ यात होणारा वाद, कौटुंबिक वाद, गावातील वाद हे गावातच मिटायला हवेत. तंत्रज्ञानाने प्रगती केली असली तरी घरात संस्कार, संयम, परोपकार अश्या बाबी अंगिकारल्या तर कायद्याचे काम कमी होईल. यावेळी त्यांनी बाल लैंगिक अत्याचार,नोकरी करणाऱ्या स्त्रीयांना कामावरील लैंगिक छळ आदी बाबींवर प्रकाश टाकला व शिरसोली ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केसीईचे सहसचिव ॲड. प्रमोद एन.पाटील यांनीही यावेळी मणियार विधी महाविद्यालय राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ योगेश महाजन यांनी केले.

स्वागत संबोधन डॉ क्षीरसागर यांनी केले. यावेळी ऍड सुनील चौधरी यांचे समोयोजित भाषण झाले. यावेळी एस.एस. मणियार विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सायबर क्राईम, बाल कामगार, घरगुती हिंसाचार, कार्यालयीन ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार, रस्ता सुरक्षा, मतदान अधिकार आदी विषयांवर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. या पथनाट्याला शिरसोली करांकडून प्रतिसाद चांगला प्रतिसाद मिळाला.

याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ बी युवाकुमार रेड्डी, सरपंच हिलाल भिल, उपसरपंच गौतम खैरे, केसीईचे सहसचिव ॲड. प्रमोद एन. पाटील, डॉ योगेश महाजन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. रेखा पाहुजा, डॉ.विजेतासिंग, प्रा. ललिता सपकाळे, प्रा.लोखंडे, झामरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी समृद्धी आंबिकर व सुजाता वाघोडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा गणपत धुमाळे यांनी केले.

Protected Content