जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी रेट ७.३६ टक्के !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढविली असून यातून आता कोरोना बाधीतांचा अर्थात पॉझिटीव्हिटी रेट ७.३६ टक्के इतका असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

जिल्हा प्रशासनाने आज कोरोना चाचण्यांबाबतची माहिती जाहीर केली आहे. यानुसार, जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणे व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन अशा संशयित व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांच्या तपासणीवर भर देण्यात येत आहेत. जेणेकरून कोरोनाची साखळी खंडीत करता येईल.

याकरीता जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत विक्रमी 5 लाख 5 हजार 649 संशयित व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली आहेत. यापैकी 4 लाख 35 हजार 403 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह तर 68 हजार 662 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

याचाच अर्थ जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर ७.३६ टक्के इतका आहे.

Protected Content