डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गजर विठ्ठलाचा कार्यक्रम उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा…, ओ पालनहारे.., चल गं सखे चल गं सखे पंढरीला… यासारखे दर्जेदार भक्तीगीतांचे सादरीकरण गजर विठ्ठलाचा या भक्ती गीतांच्या कार्यक्रमातून झाले. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे मंगळवार सायंकाळी डॉ.केतकी पाटील सभागृहात कार्यक्रम उत्साहात पार पडला.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या कल्चरल गृपतर्फे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या प्रेरणास्त्रोत गोदावरी पाटील, संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, अधिष्ठाता डॉ.एन.एस आर्विकर यांच्यासह मान्यवर उपस्थीत होते.

यावेळी डॉ.एन.एस.आर्विकर, डॉ.माया आर्विकर, डॉ.अमृत महाजन, डॉ.दिनेश नेहेते, डॉ.देवयानी नेहेते, डॉ.अनंत बेंडाळे, डॉ.ओंकार, डॉ.विक्रांत, डॉ.प्रणव, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, ऐश्वर्या आणि पवन यांनी भक्ती गिते सादर केली. कार्यक्रमाचे संयोजन व सुत्रसंचालन डॉ.अमृत महाजन यांनी केले. यावेळी २०० हून अधिक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थीत होते.

दर्जेदार भक्तीगीतांचे सादरीकरण

कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ठ्येे म्हणजे संस्थेच्या सचिव डॉ. वर्षा पाटील यांनी केशवा माधवा तुझे नामात गोडवा हे भक्तीगीत गायिले. तसेच डॉ.माया आर्विकर यांनी पैल तोहे काऊ.. वृंदावनी वेणू.., डॉ.एन.एस.आर्विकर यांनी कानडा राजा पंढरीचा.., खेळ मांडीयेला.., डॉ.अमृत महाजन यांनी चल गं सखे पंढरीला.., रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांनी ओ पालनहारे…, डॉ.दिनेश नेहते यांनी विठ्ठल प्रेम भाव आवडी.., डॉ.देवयानी नेहते यांनी देव माझा विठू सावळा.., डॉ.बेंडाळेंनी तुझे रुप चित्ती.., विक्रांत व प्रणव यांनी माऊली माऊली या गीतांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

Protected Content