लायन्स क्लबतर्फे किडनीसंबंधी रक्त तपासणी व उपचार शिबीर

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | अमळनेर शहर व तालुक्यातील रुग्णांसाठी लायन्स क्लब अमळनेरतर्फे मूत्रपिंड व मूत्र विकार तपासणी शिबीर अंतर्गत मोफत तपासणी, सल्ला व किडनी संबंधित रक्त तपासण्या व डायलिसीस यावर उपचार केले जाणार आहेत.

लायन्स क्लब तर्फे आवाहन करण्यात आले आहे की, उच्च रक्तदाब,लघवी मधून फेस निघणे,उलट्या मळमळ होणे,लघवीत जळजळ होणे,चेहऱ्यावर अथवा डोळ्याखाली सूज येणे,डायलिसीस,लघवी लालसर होणे,किडनी विकार,किडनी
प्रत्यारोपण यावर तज्ञ डॉ. निखिल शिंदे यांच्याकडून तपासणी व उपचार केले जाणार आहेत.

या आजारांशी संबंधित रुग्णांनी डॉ.सुमित सूर्यवंशी, डॉ.संदेश गुजराथी, डॉ.रवींद्र कुलकर्णी, डॉ.पंकज चौधरी, डॉ.निखिल बहुगुणे, डॉ.मिलिंद नवसारीकर, डॉ.मंजिरी कुलकर्णी, डॉ.संदीप जोशी, डॉ.प्रशांत शिंदे, डॉ.युसूफ पटेल, डॉ.बी.आर.बाविस्कर, डॉ.नरेंद्र महाजन, डॉ.रवींद्र जैन, डॉ.किशोर शहा, डॉ.मयुरी जोशी, डॉ.दिनेश महाजन तसेच मानसी मेडिकल,विजय मेडिकल व अथर्व मेडिकल या ठिकाणी नावे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले असून हे शिबीर २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यन्त चालणार आहे.शहरातील ग्लोबल स्कूल जवळील श्री अँक्सीडेंट हॉस्पिटल अँड ट्रामा सेन्टर या ठिकाणी शिबीर होणार असून तालुका व शहरातील जनतेने शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन लायन्स चे प्रेसिडेंट योगेश मुंदडे, सेक्रेटरी महावीर पहाडे, ट्रेझरर अनिल रायसोनि, प्रोजेक्ट चेअरमन डॉ.सुमित सूर्यवंशी तसेच लायन्स क्लब च्या सर्वच सदस्यांनी केले आहे.

Protected Content