Home Cities जळगाव भाजपातर्फे तंट्या भिल्ल वस्तीत महिलांना साडी व फराळ वाटप

भाजपातर्फे तंट्या भिल्ल वस्तीत महिलांना साडी व फराळ वाटप


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने गुरूवार २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता तंट्या भिल्ल वस्ती येथे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते ७२ गरीब महिलांना साड्या, फराळ व लहान मुलांना लाडूचे वाटप करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे यंदा देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार राजूमामा भोळे यांच्या वतीने भाऊबिज निमित्त महिलांना साड्या, फराळ व लहान मुलांना लाडूचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे व भाजपाचे महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांच्याहस्ते देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा पदाधिकारी रेखा कुलकर्णी, प्रा. जिवन अत्तरदे, राजेंद्र मराठे, महेश चौधरी, निलाताई चौधरी, मनोज भांडारकर, अक्षय चौधरी, धिरज वर्मा, मंडलअध्यक्ष अजित राणे, शक्ति महाजन, अनिल जोशी, विनोद मराठे, महिला आघाडीच्या अध्यक्षा दीप्ती चिरमडे, आनंद सपकाळे, हेमंत जोशी, गजानन वंजारी, भुषण लाडवंजारी, रेखा वर्मा, भाग्यश्री चौधरी, लक्ष्मण धनगर, विक्की सोनार, चेतन तिवारी, सना खान, रियाज शेख, जब्बार शेख, महोम्मद शेख, राहुल पाटील, नंदिनी दर्जी, मालती जुनागडे, चित्रा मालपाणी, संगीता चौधरी यांच्यासह आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound