पांझरापोळ गो शाळेत सामूहिक गोसेवा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पांझरापोळ गो शाळा येथे गुरुवार , २७ ऑक्टोंबर रोजी ॲङ विजय काबरा व वीर सावरकर रिक्षा युनियन यांच्या रिक्षा चालक बांधवांकडून दिवाळीनिमित्त सामूहिक गोसेवा करण्यात आली.

यावेळी गोमाता की जय असा जय घोष करत गोशाळेत असलेल्या गाईंना केळी लापसी, व चारा खाऊ घालण्यात आला.

विशेष म्हणजे रिक्षा चालकांकडून करण्यात आलेल्या गो सेवेमध्ये हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे दर्शन दिसून आले. या ठिकाणी अनेक हिंदू व मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. यावेळी वीर सावरकर रिक्षा युनियन चे अध्यक्ष दिलीप सपकाळे तसेच रिक्षा चालकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग नोंदविला तर वाहतूक शाखेचे कर्मचारी देखील सहभागी झाले होते .

Protected Content