बनावट कागदपत्रांद्वारे वाहन नोंदणी; जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । फ्लॅटची बनावट कागदपत्रे तयार करून आरटीओ ऑफीसमध्ये वाहन नोंदणी केल्या प्रकरणी जळगावातील तरूणाविरूध्द पुणे विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील राहिवासी पवन नंदलाल वरयाणी ( रा. कंवरनगर, सिंधी कॉलनी परिसर )याने पुणे येथील विमानतळ भागातील गुलमोहन रॉयल को.ऑप हौसिंग सोसायटीतील घर नं. ५०५ या घरात राहत असल्याचे बनावट कागदपत्र तयार केले. ते वाहन नोंदणीसाठी आरटीओ ऑफीसमध्ये दाखल केले होते. यासंदर्भात वाहनाचे दस्तऐवज फ्लॅटच्या लेटर बॉक्समध्ये आल्यानंतर फ्लॅट मालकाने मुलमुख्यत्यारपत्र करून दिलेले ज्वेल मोरीस पॉल यांच्या लक्षात आले. पॉल यांनी तातडीने प्लॅटचा लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स करार केलेल्या स्लायशा दिक्षित यांना विचारणा केली. तसेच फ्लॅट मालक मर्जवान फिरोशहा वेलाटी यांनाही त्यांनी कोणाला भाडे करार दिल्याचे विचारले; परंतु दोघांनीही कोणालाही करारनामा दिला नसल्याचे सांगितले.

दरम्यान, पॉल यांनी पुणे आरटीओ कार्यालयात चौकशी केल्यानंतर, बनावट भाडे करार बनवल्याचे उघड झाले. त्यांनी यासंदर्भात विमाननगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content