तांत्रिक कारणावरून नगरपंचायतीची बैठक पुन्हा तहकूब

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा तांत्रीक कारणावरून तहकूब करण्यात आली असल्याचे लागोपाठ दोनदा सभा तहकुबीची नाचक्की ओढवली आहे.

अलीकडेच मुक्ताईनगर नगरपंचायतीची सभा तहकूब करण्यात आली होती. या अनुषंगाने शुक्रवारी या बैठकीचे ऑनलाईन या प्रकारात पुन्हा आयोजन करण्यात आले.या ऑनलाइन बैठकीत ११ नगरसेवकांनी सहभाग नोंदवला. बहुतांश नगरसेवकांनी आमचा आवाज मुद्दाम ऑनलाइन बैठकीत बंद केल्याचा आरोप केला. यामुळे ही बैठक पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली.

या बैठकीला नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनीषा पाटील, गटनेता पीयूष मोरे, नगरसेवक संतोष कोळी, कुंदा पाटील, शबाना बी आरिफ, मुकेश वानखेडे, नीलेश शिरसाठ, बिल्किस बी अमानुल्ला खान, शमीम बी अहमद खान, नुसरतबी मेहबूब खान, साधना ससाणे, बिल्किस बी आसिफ बागवान, शेख शकील शेख शकूर ,शेख मस्तान शेख इमाम कुरेशी हे नगरसेवक उपस्थित होते. तर या सभेला शिवसेनेचे गटनेते राजेंद्र हिवराळे, उपगटनेते संतोष मराठे, सविता भलभले अनुपस्थित होते.

Protected Content