जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडाशिक्षक पुरस्कार जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रदिप तळवलकर व सचिव राजेश जाधव यांनी जाहीर केले . यात जिल्हास्तरीय क्रीडा गौरव पुरस्कार स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव प्रा. डॉ. रणजित शामराव पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे

जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. आलेल्या प्रस्तावाची छाननी जिल्हा क्रीडाशिक्षक पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ए टी झाबरे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी व्ही चौधरी, सदस्य प्रशांत जगताप, किशोर पाटील, समिधा सोवनी व डॉ कांचन विसपुते यांच्या समितीने केली.

इतर पुरस्कार्थीं पुढील प्रमाणे :
जिल्हास्तरीय क्रीडा जीवन गौरव पुरस्कार– गोविंदा जुलाल पाटील (आदर्श कन्या विद्यालय भडगाव)
जिल्हास्तरीय क्रीडा गौरव पुरस्कार – प्रा डॉ रणजित शामराव पाटील (स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव).

जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडाशिक्षक पुरस्कार-
शेख सादिक शेख इमाम (ग्रामविकास विद्यालय हरेश्वर पिपळगाव ता पाचोरा), संदिप हिरामण पवार (नागरिक शिक्षण मंडळाचे विद्यालय तामसवाडी ता पारोळा), दिपक कृष्णा चौधरी (ना आ बोरसे विद्यालय शहापूर ता जामनेर), देविदास हिरामण महाजन (झि तो महाजन विद्यालय धानोरा ता चोपडा), विजय मारोती लोंढे (जे ई स्कुल मुक्ताईनगर), बालू देवराम साळुंखे (गो पु पाटील विद्यालय कोळगाव ता भडगाव), किशोरकुमार उत्तमराव पाटील (माध्यमिक विद्यालय विरोदा ता यावल), राजेश श्रीराम अंजाळे (न ह रांका विद्यालय बोदवड), सचिन लोटन सुर्यवंशी (सारजाई कुडे विद्यालय धरणगाव), प्रा मनोज नत्थु पाटील (दादासाहेब डी एस पाटील कनिष्ठ महाविद्यालय एरंडोल), लक्ष्मीकांत वसंत नेमाडे (महात्मा गांधी विद्यालय वरणगाव ता भुसावळ), प्रशांत सुधाकर महाजन (माध्यमिक विद्यालय कुसुम्बा ता जळगाव), अजय गोपाळराव देशमुख (राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव), सुनिल प्रभाकर वाघ (जि एस हायस्कुल अमळनेर), अविनाश राजधर महाजन (वा. कृ. पाटील विद्यालय मस्कावद ता रावेर), प्रा हरीश मुरलीधर शेळके (ऍड एस ए बाहेती कनिष्ठ महाविद्यालय जळगाव). इंग्लिश मिडीयम स्कुल गट- जितेंद्र किसन शिंदे (सेंट टेरेसा कॉन्व्हेट स्कुल जळगाव).

पुरस्काराचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करून करण्यात येईल असे जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघ राजेश जाधव यांनी कळविले आहे.

Protected Content