Home Cities जळगाव शनिवारी महिला सहकारी मंडळाची वार्षिक सभा

शनिवारी महिला सहकारी मंडळाची वार्षिक सभा

0
33

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथिल सर्वात जुनी सहकार तत्वावर चालणारी महिलांची महिला सहकारी मंडळ या संस्थेची ७६ वी वार्षिक सर्व साधारण सभा  शनिवार  ८  आक्टोबर  रोजी आयोजित करण्यात आली आहे.

 

महिला सहकारी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दोन वर्षा नंतर घेण्यात येत आहे.  मंडळाच्या  अध्यक्ष प्रतिमाताई अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली  शनिवार ८ आक्टोबर रोजी  पत्रकार भवन, तहसिल कार्यालया शेजारी येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली  आहे. या सभेत सहकारी मंडळाच्या कामकाजाचा आढावा, संस्थेची आर्थिक उलाढाल, अंदाज पत्रक, नफातोटा पत्रक, ताळेबंद, सभासदां समोर ठेवण्यात येवून त्यास मंजुरी घेणे, पुढील कामकाजाची माहिती देणे आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे.          या वार्षिक सभेस मंडळाच्या सभासदांनी उपस्थित राहाण्याची विनंती सचिव शांता वाणी आणि सर्व संचालकांनी केली आहे.


Protected Content

Play sound