गोलाणी मार्केट परिसरातून दुचाकी लंपास; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमधील दत्त मंदीराजवळून एका व्यावसायिकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी ७ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील कंवरनगरात खुशाल वासुदेव छाबडीया हे वास्तव्यास असून त्यांच्याकडे (एमएच १९ एए ०६०९) क्रमांकाची दुचाकी आहे. त्यांनी मंगळवारी ४ जुलै रोजी आपली दुचाकी गोलाणी मार्केट परिसरातील मागील बाजूस असलेल्या गुरुदत्त मंदिरासमोर लावली होती. दरम्यान, चोरटयाने त्यांची दुचाकी चोरुन नेली. ही घटना उघडकीस येताच छाबडीया यांनी संपुर्ण परिसरात दुचाकीचा शोध घेतला, मात्र तरी देखील त्यांना दुचाकी मिळून न आल्याने अखेर खुशाल छाबडीया यांनी शुक्रवारी ७ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना योगेश पाटील हे करीत आहे.

Protected Content