जळगावात कापड दुकान फोडले; साडेतीन लाखांची रोकड लंपास (व्हिडीओ)

jalgaon chori

जळगाव प्रतिनिधी । शहर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बळीराम पेठेतील कापडाचे दुकान फोडून तिजोरीत ठेवलेले साडे तीन लाखांची रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आले. याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, राम गंगूमल कटारिया (वय-५५) रा. गणेश नगर यांचे भाजपा कार्यालयाच्या मागे असलेल्या बळीराम पेठेत शेरू ॲण्ड टॉवरच्या पहिल्या मजल्यावर यु.जी.रेडीमेड गारमेन्ट म्हणून दुकान आहे. या दुकानावर गेल्या दोन महिन्यांपासून दोन कर्मचारी तर देान दिवसांपासून दोन असे एकुण चार कर्मचारी कामाला आहे.

आज रविवार असल्याने त्याच्या दुकानाच्या कामासाठी फर्निचर मिस्तरी कामासाठी आले. त्यावेळी त्यांना अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडल्याचे लक्षात आले. मिस्तरींनी दुकानदार राम कटारिया यांना घटनेची माहिती दिली. कटारिया दुकानावर आले असता त्यांना तिजोरीत ठेवलेले ३ लाख ६५ हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी तिजोरी फोडून लंपास केले. एवढेच नाही तर पहिल्या मजल्यावर लावलेले सीसीटीव्हीचे डीव्हीआर देखील चोरट्यांनी तोडून लंपास केलेत. दरम्यान इमारतीवर जाण्यासाठीच्या जिन्याला लावलेल्या कुलूपही तोडून त्यांनी आत प्रवेश केला होता. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यावेळी दोन अज्ञात चोरटे रात्री १.२३ चोरी करण्यासाठी आत प्रवेश करत दुकान फोडून अवघ्या १२ मिनीटात चोरी करून रोकड लंपास केली आहे.

कटारीया यांनी शहर पोलीसांना घटनेची माहिती दिली व घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आहे. दरम्यान दुकानावरील काम करणाऱ्या कर्मचारी यांच्याशिवाय इतरांना तिजोरीत रक्कम असल्याचे माहिती नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/262218151413948/

Protected Content