मुंबईत मनसेच्या महामोर्च्यास प्रारंभ

Raj 2

मुंबई प्रतिनिधी । पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित महामोर्च्यास प्रारंभ झाला असून यात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चाला प्रारंभ करण्यात आला आहे. गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या मार्गावर हा मोर्चा असणार आहे. त्यानंतर आझाद मैदानावरील सभेला राज ठाकरे संबोधित करणार आहेत. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मनसेचे आपली पूर्ण शक्ती पणास लावली आहे. राज्यभरातून मनसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने यात सहभागी झालेले आहेत. या मोर्चासाठी मुंबईतील काही मार्ग बंद केले आहेत. तर काही मार्गात बदल करण्यात आले आहेत. याचबरोबर, मोर्चात अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

मोर्चा सुरू होण्याआधी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आमच्या मोर्चामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच अशा पद्धतीनं टीका केली जात आहे. पण, त्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. आम्ही मोर्चातून उत्तर देऊ असे म्हटले आहे.

Protected Content