बिहारमध्ये अंतिम टप्प्यातील मतदानास प्रारंभ

पाटणा वृत्तसंस्था । बिहारमध्ये तिसर्‍या व अंतिम टप्प्यातील मतदान आज सकाळपासून मतदान सुरू झाले असून, १६ जिल्ह्यांतील ७८ जागांसाठी नागरिक मतदान करत आहे. यात प्रामुख्याने सीमांचल व मिथिलांचल प्रांतांतल्या १६ जिल्ह्यांमधील जागांचा समावेश आहे.

बिहारमध्ये दोन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, अंतिम टप्प्यातील मतदानाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. पहिल्या दोन टप्प्यांत प्रामुख्याने संयुक्त जनता दल-भाजप आघाडी व काँग्रेस-राष्ट्रीय जनता दलप्रणीत महागठबंधन यांच्यादरम्यान लढती होत्या. यातील काही मतदारसंघांत चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीने संयुक्त जदसमोर आव्हान निर्माण केले होते. तर तिसर्‍या व शेवटच्या सर्वांचीच कसोटी लागली आहे.

२०१५ च्या निवडणुकीवेळी ७८ जागांपैकी तब्बल ५८ जागा महागठबंधनने जिंकल्या होत्या; पण त्यावेळच्या निवडणुकीत संयुक्त जनता दल हा महागठबंधनमध्ये सामील होता. त्यावेळी रालोआमध्ये भाजप, लोकजनशक्ती पार्टी, कुशवाह यांचा पक्ष तसेच जितनराम मांझी याचा हम पक्ष सामील होते. त्यावेळी आघाडीला ७८ पैकी केवळ २४ जागा जिंकता आल्या होत्या. यातही भाजपचा वाटा १९ जागांचा होता. आता मात्र राजकीय स्थिती पूर्णपणे बदलली आहे. यासोबत जेडीयूचे खा. वैद्यनातो महातो यांच्या निधनाने रिक्त झालेल्या वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी शनिवारी मतदान होत आहे. जेडीयूने येथे महातो यांचे पुत्र सुनील कुमार यांना तिकीट दिले आहे. तर त्यांच्याविरोधात माजी पत्रकार प्रवेश कुमार मिश्रा हे काँग्रेसकडून लढत आहेत.

Protected Content