Home धर्म-समाज प. पु. महासती साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज यांना स्मृतीदिनानिमित्ताने अभिवादन

प. पु. महासती साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज यांना स्मृतीदिनानिमित्ताने अभिवादन

0
47

 

पाचोरा, प्रतिनिधी । येथील जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यु इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये प. पु. महासती साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज साहब यांचा प्रथम स्मृती दिन साजरा करण्यात आला.

प्रथम महासती साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षिका प्रियंका बांठिया यांनी महाराज साहब यांच्या कार्याबदद्ल माहिती सांगुन नवकार मंत्राचे उच्चारण केले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्ष गिरीष कुलकर्णी, सचिव जीवन जैन, स्कुल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी, स्कुल कमिटी सचिव रितेश ललवाणी हे उपस्थित होते. कार्यकमाचे सुत्रसंचालन सचिन करंदीकर यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी मास्क लावुन सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते.


Protected Content

Play sound