गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे ऑटिझम जनजागृतीवर स्किट सादर

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात २ एप्रिल रोजी जागतिक ऑटिझम जागरूकता दिननिमित्ताने स्कीट करण्यात आले. यासोबत पोस्टर सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली.

 

ऑटिझम हा एक मानसिक आजार असून तो पहिल्यांदा मुलांमध्ये दिसून आला होता. जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांनी हक्क लक्षात ठेवण्याचा दिवस म्हणून ओळखला आहे. मानसिक आरोग्य नर्सिंग विभागाद्वारे आयोजित जगभरातील ऑटिस्टिक व्यक्तींची डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात पोस्टर स्पर्धा व जनजागृतीपर स्किट सादर करण्यात आले. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील प्रो.अश्विनी वैद्य, प्रो.मेघा कुंभारे, प्रो.माधुरी धांडे, हिमांगी मुरकुटे, प्रो.सुमीत निर्मल, नफीस खान, नर्सिंग सुपरिटेंडेंट प्रा संकेत पाटील, मीनू धवल यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक ऑटिझम जागृकतेबाबत कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मानसिक आरोग्य नर्सिंग विभागाच्या जीएनएम द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्किट आणि पोस्टर सादरीकरण केले. यात जीएनएम द्वितीय वर्षांतील विद्यार्थी रितेश पोटोळे हा पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक तर प्रतिक्षा सुटे ही द्वितीय क्रमांकाने विजेती ठरली. रुग्णालय परिसरात आयोजित या माहितीपर उपक्रमांचे उपस्थीतांकडून कौतुक करण्यात आले.

Protected Content