आजपासून रावेर-कल्याण बस सेवेचा शुभारंभ

रावेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  कोरोना काळापासून बंद असलेली लांब पल्ल्याची बस सेवा सुरू करण्यासाठी रावेर आगारातर्फे पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत रावेर बस स्थानकात आज सायंकाळी रावेर – कल्याण बसला माऊली फाऊंडेशनचे डॉ. संदीप पाटील व पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला.

 

गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोना व एस.टी. महामंडळ कर्मचा­यांच्या संपामुळे लांब पल्ल्याच्या बसेस बंद झाल्या आहेत. आज रावेर आगारातर्फे रावेर ते कल्याण ही लांब पल्ल्याची बस सेवा सायंकाळी ६ वाजता सुरू करण्यात आली. रावेर – कल्याण बसचे माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील यांच्याहस्ते पुजन व श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्याहस्ते चालक एस. के. सोनवणे, वाहक एच. वाय. साळुंके यांचा रूमाल, टोपी व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. आगार प्रमुख एन. टी. बेंडकुळे यांनी सांगितले की, रावेर – कल्याण तसेच ब­हाणपूर – सुरत या दोन लांबपल्ल्याच्या गाडया आजपासून सुरूवात करण्यात आली आहे. लवकरच इतरही मार्गावरील लांबपल्ल्याच्या गाडयांना सुरूवात करण्यात येणार असल्याचे ही ते म्हणाले. याप्रसंगी वाहतूक नियंत्रक एस. के. पाटील, रोखपाल, पी. जी. माळी, सदानंद महाजन, अरूण चौधरी, कैलास केंद्रे, शाम भामरे आदी उपस्थित होते.

Protected Content