आरटीई प्रवेश सोडतीकडे लागले पालकांचे लक्ष

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यात आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले होते. याची मुदत गेल्या १० मार्च रोजीच संपली असून आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी जिल्ह्यातून साठी ८ हजार ३९५ अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

शैक्षणिक वर्ष २०२२- २३ साठी आरटीई कोट्यातून २५ टक्के प्रवेश दिले जातात. यासाठी ओंनलाइन अर्ज १० मार्च पर्यंत मागविण्यात आले होते. जिल्ह्यात ८ हजार ३९५ पालकांकडून विद्यार्थ्यांसाठी ओंनलाइन पोर्टलवर प्रवेश अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील मान्यता असलेल्या शाळांपैकी २८५ शाळांमध्ये आरटीई कोट्यातून २५ टक्के प्रवेश देण्याचे निर्देश आहेत. यात ३ हजार १४७ विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मर्यादा निश्चिती करण्यात आली आहे. यात १० मार्च पर्यंत ८ हजार ३९५ पालकांकडून त्यांच्या पाल्यांसाठी ओंनलाइन अर्ज दाखल आहेत. आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सोडत दिनांक अजून निश्चित नसली तरी पालकांकडून या प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा केली जात आहे.

Protected Content