चाळीसगावात पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

चाळीसगाव प्रतिनिधी । उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ चाळीसगावात शहर विकास आघाडीकडून पाळण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पुकारण्यात आलेल्या बंदला काही अंशी यशस्वी झाल्याचे चित्र दिसून आले.

याबाबत वृत्त असे की, उत्तर प्रदेशातील लखीपूर येथे शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत सुरू असताना भरधाव वाहनाने शेतकऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली. या दुदैवी घटनेबाबत देशभरात संतापाची लाट ओसळली. परिणामी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारकडून एकदिवसीय राज्यव्यापी बंद सोमवार रोजी पाळण्यात आला. या घटनेचे राज्यभरासह चाळीसगावात शहर विकास आघाडीकडून पडसाद उमटले.  दरम्यान उत्तर प्रदेशातील लखीपूर येथे घडलेली घटना हि जालियनवाला बाग हत्याकांड आहे. तसेच केंद्र सरकारने कृषी विरोधात केलेले तीन कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. यामुळे केंद्रातील सरकार हे हिटलर बनू पाहत आहे. असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष किसनराव जोर्वेकर यांनी केले. तत्पूर्वी पुकारण्यात आलेल्या बंदला शहर विकास आघाडीकडून शहरातील रेल्वे स्थानक येथून भडगाव रोड, गणेश कॉम्प्लेक्स, तहसील आवारातून घाटरस्ता या मार्गाने जाताना विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी शहर पोलिस निरीक्षक के. के. पाटील हे स्वतःह रस्त्यावर उतरून पोलिसांचे मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली होती. तसेच शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनीही चांगल्याप्रकारे बंदोबस्त केली होती. यावेळी जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव जोर्वेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष  श्याम देशमुख, युवक अध्यक्ष मोहित भोसले,  नगरसेवक भगवान पाटील, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष अनिल निकम, महिला शहराध्यक्षा अर्चना पोळ, माजी आमदार ईश्वर जाधव, ए.व्ही.पाटील, देवेंद्र पाटील, अल्ताफ खान, रविंद्र जाधव, आर.डी. चौधरी, शिवसेना पक्षाचे प्रवक्ता दिलीप घोरपडे,  सविता कुमावत, रमेश चव्हाण, भीमराव खलाने, महेंद्र पाटील व शहर विकास आघाडीचे राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content