सत्ताधाऱ्यांकडून जळगावकरांचा खिसा कापून खंडणीचा प्रयत्न ; डॉ. राधेश्याम चौधरी यांचा आरोप

WhatsApp Image 2019 05 26 at 7.37.10 PM

जळगाव (प्रतिनिधी)  महापालिकेने करसंकलनात १ एप्रिल २०१९ पासून घनकरचा व्यवस्था (रहिवास +अरहीवास ) सेवा शुल्क हा नवीन कर वाढविला आहे.नव्याने कर लादून मनपासत्ताधारी हे एक प्रकारे खंडणीच वसूल करताहेत असा आरोप करून हा नवीन सेवा शुल्ककर तातडीने मागे घ्यावा अशी मागणी शहर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष तथा जळगाव फस्टचे समन्वेयक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली.

ते पुढे म्हणले की , घन कचरा संकलन व त्याची विल्हेवाट,व्यवस्थापन यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या भागीदारीने ३० .७५ कोटी रुपयांचा डीपीआर १ मार्च २०१८ रोजी मंजूर् झालेला आहे .या प्रकल्प अंतर्गेत केंद्र सरकार १०.७५ कोटी ,राज्य सरकारने ७.१७ कोटी अशे १७.९२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे .त्यापैकी ८.९६ कोटी रुपये हे मनपाकडे आलेले देखील आहेत. उर्वरित मनपाचे योगदान हे १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून द्यावयाचे आहे. डीपीआर मंजूर होऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला असतांनाही ,भाजपला सत्तेत येऊन ८ महिने होऊनही ,निधी आलेला असूनही हा डीपीआर पूर्णपणे का कार्यान्वित झालेला नाही ? मग घोडे कुठे अडले ? वर्षभरापेक्षा जास्त कालावधी लोटूनही या डीपिआरची फक्त १५ % अंमलबजावणी झालेली दिसत आहे . याला प्रशासनाची निष्क्रियता म्हणावे कि सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा ? असा प्रश्न डॉ. चौधरी यांनी उपस्थित केला. हे मनपातील सत्ताधाऱ्यांचे अपयश नाही का ? याला कोण जबाबदार ? याविषयी मनपा प्रशासन व महापौर व सत्ताधारी आमदार अर्थात प्रती महापौर राजूमामा भोळे यांनी उत्तर द्यावे असे आव्हान त्यांनी दिले. यावेळी सत्ताधाऱ्यांना नवीन प्रकल्पासाठी निधी येऊनही अजून जुनेच सफाईचे ठेके सुरु असल्याचे कळते ही शुद्ध जळगावकरांची फसवणूक सुरु आहे. या सफाई ठेक्यान्विरुद्ध आम्ही आधीही आवाज उठविला होता. मग भाजपा ह्या ठेक्यांद्वारे गेल्या आठ महिन्यांपासून कुणाचे हित रक्षण करते आहे ? असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. हा नवीन प्रकल्प कार्यान्वित न झाल्यामुळे अजून ही खोटेनगर ,दादावाडी ,निमखेडी ,मुक्ताईनगर ,पिंप्राळा,आव्हाने येथील रहिवासी कचरा जळल्यामुळे होणाऱ्या असह्य वायू प्रदूषणाचा सामना करीत आहेत .त्यातून जर काही मोठी दुर्घटना घडली तर मनपा प्रशासन व सत्ताधारी दोहोंवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास आम्ही कचरणार नाही .हा नवीन कर तातडीने मागे घ्यावा रद्द करावा अन्यथा त्यासाठी आम्ही जळगावकरांच्या हितासाठी आंदोलनाचा पवित्रा घेऊ. शहरातील विविध सामाजिक ,राजकीय संघटना यांच्याशी चर्चा करून समविचारी समूहांना सोबत घेऊ ..वेळ पडल्यास न्यायालयाचा दरवाजा देखील जळगाव करांसाठी आम्ही ठोठाउ .

सत्ताधारी प्रश्न सोडविण्यात अपयशी
भाजपा प्रत्येक निवडणुकीत मोठ मोठे आश्वासन देऊन भोळ्या भाबड्या जळगावकरांची मते पदरात पडून घेते. निवडणुका जिंकल्यावर मात्र सोयीस्करपणे जळगावकरांना गृहीत धरून जळगावकरांच्या हक्काकडे दुर्लक्ष करते. अजून ही समांतर रस्त्यांचे काम सुरु झाले नाही.गाळेधारकांचा प्रश्न प्रलंबित आहेच .त्यावर तोडगा काढण्यात सत्ताधाऱ्यांना अद्यापपर्यंत तरी अपयश आलेय .व्याजाचा भुर्दंड मात्र जळगावकर व गाळेधारक यांच्यावर वाढतच आहे. एकंदरीत निवणुकीत फक्त आश्वासनांची गाजरे दाखवून जळगावकरांची मते पदरात पडून घ्यायची व नंतर जळगावकरांचा विश्वासघात करीत त्यांना वाऱ्यावर सोडायचे हीच भाजपाची भूमिका राहिल्याचे दिसते.

Add Comment

Protected Content