गावागावात संघटन मजबूत करा – माजी आमदार चौधरी

former MLA meeting

फैजपूर, प्रतिनिधी | मतदार संघातील पक्ष संघटन मजबूत करून गावागावात आपले मतदान कसे सुरक्षित राहील, यासाठी आपापला गाव व बूथ सांभाळून जोमाने कामाला लागा, असे आवाहन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आज (दि.२४) केले.

येथील धनाजीनाना महाविद्यालयात आयोजित आदिवासी सेल समिती जाहीर करण्याच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आपल्या समाज हितासाठीच्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करून मेहनत करा. आपणा सर्वांची साथ माझ्या पाठीशी आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी आदिवासी सेल समिती घोषित करण्यात आली. कार्यक्रमाला आदिवासी तडवी भिल्ल समाजाचे जेष्ठ समाज सेवक रमजान रसूल तडवी, मासुम रहेमान तडवी, अहमद बुऱ्हाण तडवी, धनंजय शिरीष चौधरी, संजय जमादार, बलदार लालखा तडवी, रशीद रसूल तडवी, यांच्यासह यावल तालुक्यातील विविध गावातील तरुण उपस्थित होते.

Protected Content