दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के

bhukanp

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । दिल्ली-एनसीआरमध्ये आज दुपारी ४ वाजून ३५ मिनिटांनी भूकंपाचे जोरदार धक्के बसल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी असंख्य लोकांनी भीतीपोटी घराबाहेर तसेच कार्यालयाबाहेर पडावे लागले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी ४ वाजून ३५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानमधील रावळपिंडी या ठिकाणी असल्याची माहीती आहे. भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी असून हरियाणा, पंजाब, दिल्ली, काश्मीर, हिमाचल प्रदेशमधील वेगवेगळ्या भागात भूकंपाचे धक्के बसले. काश्मीरमधील राजौरी, पुंछ, जम्मू, उधमपूर आणि रामबनमधील काही भागात भूकंपाचे धक्के बसल्याचे नागरिकांनी सांगितले. उत्तर भारतातील अनेक राज्यात आज दुपारी भूकंपाचे धक्के बसले. जम्मू काश्मीरलगत भारत-पाकिस्तान सीमेजवळ भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे.

Protected Content