शरद पवार गटाचा दहावा आणि शेवटचा उमेदवार जाहीर

सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर माढयामध्ये ते निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.विजयसिंह मोहिते पाटील हे सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी राहणार आहेत. संपूर्ण मोहिते पाटील कुटुंब शरद पवार गटासोबत आहे. संजीवराजे निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर सुद्धा शरद पवार गटाला साथ देणार आहेत.

दोन, तीन दिवसांपूर्वी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माढामध्ये महायुतीने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज होते. त्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला शरद पवार यांनी धक्का दिला आहे.

माजी आमदार नारायण आबा पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. नारायण पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत. ते करमाळा विधानसभा मतदारसंघातून 13व्या विधानसभेत निवडून आले होते. २०१४ ते २०१९ काळात ते आमदार होते. यामुळे करमाळ्यात शिंदे गटाला झटका मिळणार आहे.

Protected Content