Home Cities यावल जे. टी. महाजन इंग्लिश स्कुलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

जे. टी. महाजन इंग्लिश स्कुलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील व्यास शिक्षण मंडळाव्वारे संचलीत जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल मध्ये महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांची १३३वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन यांनी स्वीकारले. त्यानंतर कार्यक्रमचे अध्यक्ष यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येवुन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका मनीषा पाटील व श्रीमती संध्या पांडव यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवन व त्यांनी देशासाठी केलेल्या अमुल्य कार्या विषयी माहिती सांगितली जे टी महाजन शाळेच्या दालनात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती प्रियंका फेगडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार लता इंगळे यांनी केले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.


Protected Content

Play sound