…अन् खामगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांना आठवला ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’

खामगाव, -अमोल सराफ | चिल्लर नाणी मोजताना खामगाव नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. मार्च अखेरपर्यंत कर वसुली प्रत्येक नगरपालिकेत सुरू आहे. याच करता खामगाव येथील एका चिप्स विक्रेता व्यापाऱ्याने चक्क ५४ हजार रुपयांची चिल्लर नाणी कर भरण्याच्या करता आल्याने स्थानिक नगर पालिका कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली

 

काही वर्षांपूर्वी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, नावाचा मराठी चित्रपट चांगलाच गाजला होता. हे सांगण्याचे कारण म्हणजे बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव नगर परिषदेत त्या चित्रपटातील प्रसंग जसाच्या तसा घडला. या चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपूरे यांनी जे केले, ते येथे एका चिप्स व्यावसायिकाने केले. त्यामुळे पालिकेतील कर्मचाऱ्यांची मात्र चांगली तारांबळ उडाली. मार्च अखेरपर्यंत कर वसुली प्रत्येक नगरपालिकेत सुरू आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मालमत्ता कर, नळपट्टी कर आदी वसूल केला जातो. त्यासाठी नागरिकसुद्धा कर भरताना दिसत आहेत. असाच मालमत्ता करधारक खामगाव नगरपालिकेत कर भरण्यासाठी पोहोचला, तेव्हा कर विभागात एकाच गोंधळ उडाला. कारण खामगाव येथील जगदीश कल्याणदास बोहरा यांच्याकडे मालमत्ता कर ९३ हजार ८३३ रुपये कराची थकबाकी होती. तो कर भरण्यासाठी बोहरा १, २ व ५ रुपयांची नाणी अशी ५४ हजार रुपयांची चिल्लर ४ कॅरेटमधून ५४ हजारची रक्कम कर विभागात आणली. एवढी चिल्लर पाहून कर्मचारी अचंबित झाले. हे केव्हा मोजायचे असा प्रश्न त्यांना पडला. आजच्या परिस्थितीत व्यवहारात काही नाणी घेतली जात नाहीत. तेव्हा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी फक्त २० हजार रुपयांची नाणी स्वीकारली व बाकी रक्कम टप्या टप्प्याने भरण्याचे सुचविले.

Protected Content