पाचोरा येथील गो. से. हायस्कूलमध्ये शिक्षकांची सहविचार सभा

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । १५ मार्चपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या एसएससी परीक्षेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून येथील गो. से. हायस्कूलचे मुख्याध्यापक व केंद्र संचालक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व शिक्षकांची सहविचार सभा  आयोजित करण्यात आली होती.

परीक्षेबाबत मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना कोरोना बाबतचे प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळण्याचे आवाहन केले. तसेच सोशल डिस्टंसिंग सोबतच शिक्षक व विद्यार्थी यांनी मास्क परिधान करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच सर्दी, ताप, खोकला किंवा कोरोना सदृश्य कुठलीही लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केल्याची माहिती यासभेत देण्यात आली.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सॅनिटायझर तसेच हात धुण्यासाठी स्वतंत्र साबण व पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आल्याचे या सभेत सांगण्यात आले. गो. से. हायस्कूलचा केंद्र क्रमांक ३५०० (१) असून या केंद्रावर एकूण ४३३ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था मुख्य इमारतीत एकूण १८ ब्लॉक मध्ये करण्यात आलेली आहे. उपकेंद्र संचालक म्हणून प्रमिला वाघ कामकाज पाहत आहेत तर आर.एल.पाटील, एन.आर.ठाकरे व ए.बी.अहिरे हे परीक्षा समितीचे सदस्य म्हणून कामकाज पाहणार आहेत. परीक्षे दरम्यान निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणींविषयी देखील या सभेत चर्चा करण्यात आली.

 

Protected Content