मु.जे. महाविद्यालयात पाच दिवसीय कार्यशाळेचा समारोप

जळगाव प्रतिनिधी । मू. जे. महाविद्यालयातील तत्वज्ञान विभागातर्फे “एकविसाव्या शतकात उपनिषेदांचे ज्ञान”  या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचा समारोप आज बुधवारी २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आला. याप्रसंगी प्रसंगी यावेळी मंचावर के.सी.ई.सोसायटीचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे, प्रा.गोरखनाथ मिश्रा,गोवा , तत्वज्ञान विभागप्रमुख प्रा. डॉ. रजनी सिन्हा,अखिलेश शर्मा  उपस्थित होते.

उपनिषदे हे हिंदू धर्माचे महत्त्वाचे धर्मग्रंथ आहेत .त्यांची संख्या सुमारे 108 आहे, परंतु मुख्य उपनिषद 13 आहेत. प्रत्येक उपनिषद हे एका किंवा दुसर्‍या वेदाशी संबंधित आहे. यांमध्ये परमात्मा-ब्रह्म आणि आत्मा यांचे स्वरूप आणि संबंध यांचे अत्यंत तात्विक आणि ज्ञानपूर्ण वर्णन दिलेले आहे. तत्वज्ञान विभागातर्फे आयोजित कार्यशाळेच्या पाचव्या दिवसाच्या प्रथम सत्रात पूनम सिंग यांनी उपनिषद तत्व सांगताना सांगितले.

पुढे बोलतांना पूनम सिंग म्हणाले कि, शंकराचार्य यांनी सांगितलेले उपनिषद महत्त्वाचे नसून सारीच उपनिषद महत्त्वाचे आहेत असे प्रतिपादन केले.चौथ्या दिवसाच्या प्रथम सत्रात मणी शस्त्री यांनी सांगितले ,  बृहदारण्यक उपनिषद हे खूप प्राचीन आहे आणि आत्मा, ब्रह्मांड आणि त्यातील ब्रह्मा (ईश्वर) याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. आदि शंकराचार्यांनीही या तात्विकदृष्ट्या महत्त्वाच्या उपनिषदावर भाष्य लिहिले आहे. हा शतपथ ब्राह्मण ग्रंथाचा एक विभाग आहे आणि शतपथ ब्राह्मणाच्या मजकुरात समाविष्ट आहे.यजुर्वेदातील प्रसिद्ध पुरुषसूक्ताशिवाय त्यात अश्वमेध, असतो मा सद्गमया, नेति नेति असे विषय आहेत. याज्ञवल्क्य ऋषी आणि मैत्रेयी यांच्यातील संवाद अतिशय पद्धतशीर आणि कुशल आहे. कार्यशाळेच्या चौथ्या दिवसाच्या प्रथम सत्रात मणी द्रविड शास्त्री यांनी तत्वज्ञानातील बृहदारण्यक उपनिषद प्रथम व द्वितीय अध्याय सांगताना सांगितले. प्रो.विनिता अवस्थी यांनी पुराणात देखील पर्यावरणाची आराधना केली आहे.इश्वर निसर्गात अनेक रुपात प्रकट आहेत. संयोजन व आभार प्रा. डॉ. देवानंद सोनार व अखिलेश शर्मा  यांनी केले.कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी अमोल पाटील,राजश्री पाटील,प्रा.पंकज खासबागे यांनी परिश्रम घेतले.

 

 

 

 

 

Protected Content