नीलगाईला दुचाकीची धडक; आसोदा येथील तरूण ठार

जळगाव प्रतिनिधी । शेळगाव भादली रस्त्याने मित्राच्या दुचाकीने रात्री बाहेर निघालेल्या तरूणाच्या वाहनाला निलगायीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याचे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

सविस्तर माहिती अशी की, श्याम शांताराम कोळी (वय-३६) रा. आसोदा ता.जि.जळगाव हा तरूण आईवडील, पत्नी व दोन मुलांसह  राहतो. मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास मित्राची दुचाकी (बुलेट) घेवून कामानिमित्त बाहेर पडला होता. शेळगाव-आसोदा रस्त्यावर एका शेतातजवळून जात असतांना रस्त्यावर अचानक निलगायीने जोरदार धडक दिली. यात श्याम कोळी दुचाकीवरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार आज मंगळवारी सकाळी ६ वाजता शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने उघडकीला आला. श्याम कोळी यांचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. 

मयताच्या पश्चात आई कलाबाई, वडील शांताराम रामदास कोळी, पत्नी सीमा, मुलगा हेमंत आणि मुलगी वैष्णवी असा परिवार आहे. मयत श्याम कोळीचे वडील आसोदा ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून नोकरीला आहे. एकुलता एक मुलगा केल्याने आईवडीलांनी एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

 

Protected Content