जिल्हा सहकारी दूध संघाची खरेदी दरात वाढ

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा सहकारी दुध संघाने गाईचे दुध प्रति लीटर एक रूपयांनी तर म्हशीच्या दुधात दीड रूपये प्रतिलिटर वृध्दी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह सहकारी दुध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. संचालक मंडळाची बैठक सोमवारी संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यात गाईचे दुध एक रूपयांनी तर म्हशीच्या दुधात दीड रूपये प्रतिलिटर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दुध उत्पादकांना गायीच्या दुधास २६ तर म्हशीच्या दुधास ३९ रूपये दर मिळणार आहे. दुध दरात वाढ करण्यात आल्याची माहिती संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी दिली.

दरम्यान, दुध संघात सध्या सुरू असणारी भरती प्रक्रिया वादाच्या भोवर्‍यात सापडली असून यात घोळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमिवर, संबंधीत भरती प्रक्रियेला स्थगिती न देता प्रक्रिया पुर्ण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Protected Content