अरे देवा !… जिल्ह्यात आज नव्याने ३७७ कोरोना रूग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज दिलेल्या अहवालात दिवसभरात तब्बल ३७७ रूग्ण नव्याने आढळून आले आहे. यात जळगाव शहरासह भुसावळ तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे अहवालात दिसून येत आहे.

 

जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण ३७७ कोरोना रूग्ण नव्याने आढळले आहे. तर ४६ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात जळगाव शहर-१५५, जळगाव ग्रामीण-९, भुसावळ-१४४, अमळनेर-१३, चोपडा-१५, पाचोरा-१, भडगाव-७, धरणगाव-१, यावल-२, एरंडोल-३, जामनेर-२, रावेर-३, पारोळा-१, चाळीसगाव-२०, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ३७७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४४ हजार ८०५ बाधित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४० हजार ३७९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ८४६ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर ४६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५८० कोरोना बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!