जळगाव मनपा आयुक्त डॉ. टेकाळे यांनी स्विकारला पदभार ( व्हिडीओ )

aayuk dr uday tekale

जळगाव (प्रतिनिधी)। गेल्या महिन्यात डॉ. उदय टेकाळे यांची जळगाव नगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. आज अखेर जळगाव नगरपालिकेच्या आयुक्तपदाची सुत्रे मावळते आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याकडून डॉ. उदय टेकाळे यांनी सुत्रे दुपारी घेतले. डॉ. टेकाळे यांनी स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) चे राज्य अभियान संचालक म्हणून काम संभाळले.
शहर कचराकुंडीमुक्त करणार -आयुक्त डॉ. टेकाळे
आज दुपारी 1 वाजता तेराव्या मजल्यावर डॉ. उदय टेकाळे यांनी आपला पदभार घेतल्यानंतर त्यांनी मावळते आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्यासह अधिकाऱ्यांशी चर्चां केली. यावेळी ते बोलतांना सांगितले की, धनकचरा व्यतिरिक्त इतर कामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. तसचे शहरातचा विकास करून चेहरामेहरा बदलविण्याचा प्रयत्न करणार असून सार्वजनिक स्वच्छता आणि स्वच्छतेस अधिक प्राधान्य तसेच शासकीय योजनांची वाट न बघता महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. लोकसभा निवडणुकीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जाणार आहे. यासह शहरातील पाणीपुरवठा आणि शहर कंचराकुंडी मुक्त करण्याचा संकल्प नवनियुक्त आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी सांगितले. यावेळी मावळते आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान सायंकाळी 4 वाजता महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर मावळते आयुक्त चंद्रकांत डांगे यांना निरोप  आणि नवनियुक्त आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांचे स्वागत समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पहा । नवनियुक्त आयुक्त डॉ. उदय टेकाळे पदभार स्विकारतांना

Add Comment

Protected Content