कुसुंबा येथील घराला आग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घरात अचानक आग लागून घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. याबाबत गुरूवार २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.श्‍

याबाबत अधिक माहिती अशी की, अविनाश जुलाल धनगर (वय-३७) रा. स्वामी समर्थ शाळेजवळ, कुसुंबा ता.जि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ ते २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान, घर बंद असतांना अचानक घराला आग लागली. या आगीत घरातील लाकडी टेबल, कॉट व कपडे जळून खाक झाले आहे. याबाबत अविनाश धनगर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.

Protected Content