घरात एकटा असतांना तरूणाने उचलले टोकाचं पाऊल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील २८ वर्षीय तरूणाने राहत्या घरात झोक्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विनोद पंढरी बिऱ्हाडे (वय-२८) रा. भवानी नगर, नशिराबाद ता.जि.जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.

नशिराबाद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद बिऱ्हाडे हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. गुरूवार २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता घरी कुणीही नसतांना घरातील झोक्याच्या दोरीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी तातडीने धाव घेवून मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल नुर खान करीत आहे.

Protected Content