ललितकुमार फिरके यांना जळगाव रोटरी क्लबतर्फे नेशन बिल्डर अवार्ड

फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । न्हावी येथील रहिवासी आणि भुसावळच्या द. शि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील उपशिक्षक ललितकुमार निळकंठ फिरके यांना जळगाव रोटरी क्लबतर्फे नेशन बिल्डर अवार्डने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जळगाव येथील गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये हा समारंभ पार पडला. रोटरी क्लब जळगावतर्फे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट जॉईंट सेक्रेटरी डॉ. तुषार फिरके होते. अध्यक्षस्थानी जळगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष जितेंद्र ढाके, सचिव डॉ. सौ. काजल फिरके, कमिटी चेअरमन केदारलाल मुंदडा, कॅप्टन मोहन कुलकर्णी, योगेश गांधी, संदीप शर्मा, स्वाती ढाके, सी. डी. पाटील, सुरेश अत्तरदे व्यासपीठावर उपस्थित होते.

ललितकुमार फिरके यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, दूध उत्पादक सहकारी संस्थेचे चेअरमन नितीन चौधरी, सरपंच भारती चौधरी, शि. प्र. मंडळाचे चेअरमन पी. एच. महाजन, उपाध्यक्ष अनिल लढे, सेक्रेटरी हर्षद महाजन, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष शालिग्राम भिरूड, ग. स. सोसायटीचे माजी अध्यक्ष तुकाराम बोरोले, यावल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी, पूर्व विभाग भुसावळ माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष एल. आर. सुपे, संचालक शिवचरण उज्जैनकर, माजी अध्यक्ष डी. ए. पाटील, आळंदी येथील ज्ञानेश्‍वर शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार डॉ. दीपक पाटील, जी. डी. नेमाडे, रमेश वारके, प्रा. पी. एन. भिरुड, किशोर जावळे, निळकंठ रामदास फिरके, डॉ. जगदीश पाटील, मुख्याध्यापक एस. पी. पाटील, पर्यवेक्षक के. डी. पाटील यांच्यासह परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Protected Content