Home क्राईम शेतातून पाणी नेल्याचा कारणावरून एकाला मारहाण

शेतातून पाणी नेल्याचा कारणावरून एकाला मारहाण

0
45

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगरकठोरा येथील एका शेतमजूराला विहिरीवरून पाणी नेल्याच्या कारणावरून शेतकऱ्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना  घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर प्रभाकर पाटील (वय-४२) रा. डोंगरकठोरा ता. यावल हे शेतकरी आहे. त्यांचे डोंगरकठोरा शिवारात शेत आहे. सोमवारी २३ ऑगस्ट रोजी त्यांच्या शेतात काम करण्यासाठी काही मजूर आले होते. सकाळी १०.३० वाजता मजूर आल्यानंतर त्यांना पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी शेख पाटील हे शेजारच्या धमेंद्र प्रेमचंद पाटील रा. डोंगरकठोरा यांच्या शेतात गेले. शेतातून पाणी आणल्याचा राग धमेंद्र पाटील यांना आल्याने त्यांनी काठीने शेखर पाटील यांना बेदम मारहाण केली. तसेच पुन्हा शेतात दिसला तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. शेखर पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात धमेंद्र पाटील यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अशोक जवरे करीत आहे.

 


Protected Content

Play sound